prabodhini news logo
Home ठळक बातम्या एसटी बस आणि मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक, भीषण अपघात चालक गंभीर, विद्यार्थीही...

एसटी बस आणि मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक, भीषण अपघात चालक गंभीर, विद्यार्थीही जखमी

0
197

बुलढाणा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

बुलढाणा: बुलडाणा जिल्ह्यातील लाखनवाडा ते उदयनगर दरम्यान पिंप्री कोरडे नजिक आज,५ डिसेंबरच्या सकाळी भीषण अपघात झाला. एसटी बस आणि छोट्या मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक झाली यात दोन्ही चालक गंभीर जखमी असून बस मधील शाळकरी विद्यार्थ्यांसह काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, खामगाव आगाराची बस लाखनवाड्यावरून उदयनगरकडे जात होती. यावेळी बसमध्ये एकूण ४७ प्रवाशी होते. त्यामध्ये २० पासधारी शाळकरी विद्यार्थी होते. पिंपरी कोरडे गावानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनाची आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर बस रस्त्याच्या खाली गेली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. एसटी बसच्या चालकाला अधिक मार लागला असून काही प्रवाशी किरकोळ जखमी आहेत. बसचालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here