तालुका प्रतिनिधि,
सिंदेवाही
भारतीय जनता पार्टीने मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यात बहुमताने सत्ता स्थापन केली आहे. या विजयाचा देशभरात भाजपा कार्यकर्ते जल्लोष करीत आहे.
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे भाजपा कार्यकर्त्यानी या विजयाचा फटाक्यांची आतषबाजी करून मुख्य चौकात आनंदोत्सव साजरा केला .यावेळी ग्रा. पं.चे प्रभारी सरपंच अशोक गभने, भाजपा रत्नापुर नगर अध्यक्ष गिरीश बोरकर,माजी उपसरपंच जितेंद्र बोरकर, सेवा सहकारी सोसायटीचे संचालक संदीप डोंगरवार, ज्ञानेश्वर निकुरे, ग्रामपंचायत सदस्य वामन झोडे, पुरुषोत्तम सोनटक्के, रुपेश गभने, निकेतन लोघे, प्रवीण कोठेवार, नत्थुजी मेश्राम व इतर पदाधिकारी, कार्यकतें उपस्थित होते.

