कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही:
जसा कुंभार मातीला आकार देऊन त्या पासून मडके घडवीत असतो , त्याच प्रमाणे शिक्षक आपल्या शाळेत येणाऱ्या प्रत्येक विध्यार्थ्यांना घडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात,या मध्ये काही विध्यार्थी उंच भरारी घेतात आणि अतुलनीय कामगिरी करत आपल्या शिक्षकाचे व गावाचे नाव मोठे करीत असतात, त्याचच एक उदाहरण म्हणजे येरगाव ता.सिंदेवाही या छोटयाश्या गावातील मुलीने आपल्या गावाचे व शिक्षकाचे नाव उंचावत वक्तृत्व्य स्पर्धे मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे, क्षेत्र कोणतेही असो गरज असते मार्गदर्शनाची आणी या मुलीला प्रत्येक वेळी तिच्या पाठीशी उभे खंबीरपणे उभे राहून तिला प्रेरणा दिली आहे ते म्हणजे आदर्श शिक्षक सागर शंभरकर व नंदनावर मॅडम या शिक्षकांनी , आपल्या विध्यर्थिनीने आपले नाव मोठे केले आणी आपल्या माध्यमातुन ही विध्यार्थी घडली या सारखा आनंद नसतोच, क्षेत्र कोणतेही असो विद्यार्थ्यांना त्याच्या प्रत्येक टप्प्यात त्याना वेळोवेळी मार्गदर्शन केले. तर ते विध्यार्थी घडून संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या शिक्षकाचे व गावाचे नाव मोठे करतात,असे जर विध्यार्थी घडून जर गावाचे नाव मोठे करीत असेल तर त्या शिक्षकाच्या कार्याला व त्यानी केलेल्या कष्टाला सलामच करावे लागेल.
सिंदेवाही पासून 8 किलोमीटर अंतरावर असलेलं येरगाव या गावाची लोकसंख्या अंदाजे 200 ते 300 च्या घरात या गावात आदिवासी बांधव बहुसंख्य आहेत. गावातील आदिवासी युवती कु.शुभांगी दिलीप सुरपाम या युवतीने क्रीडा व युवक सेवा सेवा सूचनालय म.रा.पुणे व कृषी आयुक्तालय म.रा. पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे आयोजित जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धा महोत्सव 2023- 24 मध्ये भाग घेऊन प्रथम क्रमांक मिळविला आहे, आत्ता या युवतीची निवड राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धा साठी झाली असून ही स्पर्धा नागपूर इथे आयोजित होणार आहे, शुभांगी च्या या यशाबाबत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचाली साठी शुभेच्या दिल्या जात आहेत.
बॉक्स:-
माझ्या यशा मागे माझ्या सदैव पाठीशी असणारे माझे गुरुवर्य सागर शंभरकर, नंदनवार ह्या असून यांच्या कडून वेळोवेळी होत असलेल्या मार्गदशामुळे मला हे यश मिळाले आहे, माझ्या आयुष्याला आकार,आधार, व अमर्याद ज्ञान देणारे माझ्या मधील सुप्त गुणांची जाणीव करून देण्यात या दोन्ही शिक्षकाची फार मोठा सिहंचा वाटा आहे,शिक्षणाच्या ज्योतीतून ,अज्ञानाचा दूर करत सुशिक्षित पिढी घडविणारे असे शिक्षक प्रत्येक विध्यार्थ्यांना लाभायला पाहिजे.: शुभांगी सुरपाम

