
नागपूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
नागपूर – दिनांक 05/12/2023 रोजी, सायंकाळी 6:00 वाजता, रमाई बुद्ध विहार, श्रीनगर, नागपूर येथे अॕड. वैभव ओगले यांच्या स्मृती प्रित्यर्थ कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाला अनेक कवी आणि कवियत्री यांनी उपस्थिती दर्शविली आणि त्यांच्या कवितांमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनानिमित्त अभिवादन केले. तसेच अॕड वैभव ओगले यांच्या स्मृतींना सुद्धा उजाळा दिला. याप्रसंगी इ मो नारनवरे, नाना शेंडे, अस्मिता मेश्राम, हृदय चक्रधर, प्रसेंजित गायकवाड, माधुरी शेलोकर, प्रकाश धुलेवाले , सुनंदा जुलमे, पौर्णिमा मेश्राम, मनोहर गजभिये इत्यादी कवी गणांनी कविता सादर केल्या. कवी सम्मेलनाचे अध्यक्षपद माननीय कवी नाना शेंडे यांनी भूषविले. हा कार्यक्रम असोसिएशन ऑफ फॉलोअर्स ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट या संस्थेने आयोजित केलेला होता. संस्थेच्या अध्यक्ष निर्मला वाघधरे, सहसचिव शशी शामकुवर आणि इतर सदस्य राहुल हुमणे, सुमित्रा वाकोडे, अभय पाणबुडे, के एस आवळे, आर डब्ल्यू पाटील, अॕड प्रज्ञा पाटील, यामिनी तेलंग, अॕड. अस्मिता तिडके इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी व्हावा याचे कष्ट घेतले. विहाराचे अध्यक्ष आदिनाथ शामकुवर आणि सचिव लेहगावकर इत्यादी उपस्थित होते. प्रेक्षकांनी शेवट पर्यंत उपस्थित राहून कार्यक्रमाची रंगत व शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट अस्मिता तिडके यांनी केले तर आभार प्रदर्शन शशी शामकुवर यांनी केले अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला.














