अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : अमरावती येथे येत्या १५ डिसेंबर रोजी शिव महापुराण कथा व भव्य कलश यात्रा होणार असून परमपूज्य प्रदीप मिश्रा हे या कलश यात्रेत प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.याच पार्श्वभूमीवर खा.नवनीत रवी राणा यांच्या मार्गदर्शाखाली जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहरात सुद्धा आज दि.६ डिसेंबर रोजी भव्य कलश यात्रा काढण्यात आली होती.या कलश यात्रेची सुरवात लोटस हाऊस येथे गजेंद्र महाराज ठाकरे यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले. होते.तर सांगता श्री देवनाथ मठ पिठाधिश्वर परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कलश यात्रेमध्ये युवा स्वाभिमान पदाधिकारी व कार्यकर्ते,शिवसैनिक तसेच सपत्नीक माजी आमदार रमेश बुंदिले यांच्यासह माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे,भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉ.विलास कविटकर,जिल्हा जनसंपर्क प्रमुख मनिष मेन,शहराध्यक्ष उमेश भोंडे,प्रविण पटुकले,पंकज श्रीवास्तव,भाजपा जिल्हा सचिव प्रियांका मालठाने,निताताई बोचरे,विद्याताई घडेकार, संगिता ताई मेन व अनेक महिला वर्ग,महादेव भक्तगण उपस्थित होते.सर्व भक्तगणांनी हर हर महादेव व श्री. शिवाय नमोस्त्युभ्यं चा गजर करीत भक्तिमय वातावरण अनुभवले.

