अंजनगाव सुर्जी शहरात धार्मिक स्थळाला लागून शौचालय

0
57

▪️ शिवसैनिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन केले सादर

अनिल गौर
जिल्हा प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज अमरावती

अमरावती (अंजनगाव सुर्जी) : अंजनगाव सुर्जी शहरातील शनिवार पेठ येथे धार्मिक स्थळानजिक सार्वजनिक मुतारी असल्याकारणाने शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक भूमिकेत असून त्यांनी आज दि.०७ रोजी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.
शहरातील शनिवार पेठ स्थित हनुमान मंदिराला लागूनच सार्वजनिक शौचालय आहे.सदर सार्वजनिक शौचालय तात्काळ हटविण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे युवासेना शहर अध्यक्ष देविदास नेमाडे यांनी मुख्याधिकारी यांना केली आहे.जर आठ दिवसांत हिंदुत्वाच्या धार्मिक स्थळाला लागून असलेल्या सार्वजनिक शौचालय काढण्यास नगरपरिषद कार्यालय असमर्थ राहिल्यास नगरपरिषद कार्यालयासमोर शिवसेना स्टाईल ने आंदोलन करणार असल्याचा अल्टिमेटम सुद्धा शिवसैनिकांनी यावेळी दिला.
निवेदन सादर करतेवेळी युवासेना शहर प्रमुख देविदास नेमाडे,शिवसेना उपशहर प्रमुख संतोष धर्मे, चेतन मुरकुटे, देवेंद्र नाठे, गजानन शेरकार, अमोल कुरळकर, गजानन सुरकार, प्रल्हाद सुरजुसे, भारत माकोडे, अमोल सुरकार, गोपाल भावे, प्रदीप अरबाळ, आकाश बेराड आदी शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here