दलितांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार – बालासाहेब जगतकर
परळी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
केवळ बोलून नाही करून दाखवणाऱ्या पालकमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्या मधून बीड जिल्ह्याला हजारावर कोटीचा निधी तर परळी तालुक्यासाठी ३८० कोटी निधी मंजूर करून घेतला याबद्दल पालकमंत्र्याचे करावे तेवढे कौतुक कमी आहे परंतु गेल्या अनेक वर्षापासून घोषणा केलेले दलितांच्या अस्मितेचा व जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे परळी शहरातील भीम नगर येथील बौद्ध धम्म संस्कार केंद्र होय यासाठी या 380 कोटी मधून एक छतामही मिळाला नसल्याची खात्रीलायक बातमी असून यामध्ये परळी शहर व तालुक्यातील अनेक विकासात्मक काम आहेत परंतु दलितांचा मतांचा वापर करून घेण्यासाठी गेल्या पंचवार्षिक विधानसभेला सदरील धम्म केंद्राची घोषणा करण्यात आली होती ती आजतागायत पूर्णतः झालीच नाही परंतु याही हिवाळी अधिवेशनात सदरील धम्म केंद्राच्या वाढीव निधीची कुठल्याच प्रकारची मागणी केलेली दिसत नाही कारण यामध्ये सदरील बौद्ध धम्म केंद्राची कुठलीही निधीची तरतूद दिसून आलेली नाही त्यासाठी परळी शहरातील व तालुक्यातील दलित समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली असून सदरील सरकार हे जातीयवादी असल्याचे निष्पन्न होताना दिसत असल्याची माहिती ही वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे.

