विरोधी पक्षनेते ना.विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे व ब्लॅंकेटचे वितरण

0
266

शहर महिला काँग्रेसच्या सामाजिक उपक्रम…

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने शहर महिला काँग्रेसच्या वतीने सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे व ब्लॅंकेटचे वितरण करून सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्यात आला.
आयोजित कार्यक्रमाप्रसंगी शहर महिला काँग्रेस अध्यक्ष प्रीती सागरे, नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, मयूर सुचक, माजी पाणीपुरवठा सभापती दिलीप रामटेके, नगरसेवक युनूस शेख, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अभिजीत मुप्पीडवार, वैद्यकीय अधीक्षक झाडे, महेश मंडलवार, अमोल मडावी, निकु भैसारे, नगरसेविका पुजा रामटेके, पूजा मडावी, निमंत्रिता कोकोडे, पूजा सिडाम व असंख्या कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणाऱ्या स्थानिक व बाहेरगाव येथील रुग्णांना फळांचे व ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. सामाजिक उपक्रमाकरिता काँग्रेस पक्ष नेहमीच अग्रेसर असून सर्वसामान्य जनतेच्या अडचणी समस्या व मदतीकरिता नेहमी पुढे असणारा पक्ष हा काँग्रेस पक्षाचा आहे. हे या सामाजिक उपक्रमातून दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here