कोल्हापूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
आंबेडकरवादी सेना कोल्हापूर यांच्या वतीने आज मंगळवार दिनांक १९/१२/२०२३ रोजी शासकीय विश्रामगृह कोल्हापूर या ठिकाणी आढावा बैठक तसेच कोल्हापूर जिल्हा पद नियुक्ती सोहळा आयोजित केला होता.
दरम्यान कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदी कोल्हापूर जिल्ह्याचे युवा नेतृत्व मा.सचिन आडसुळे यांची नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीचे पत्र आंबेडकरवादी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.सुहास हुपरीकर, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मा.बबनराव कानडे, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते प्रा.शाहीद शेख यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिना दिवशी आंबेडकरवादी सेनेच्या पहील्या वर्धापनदिनानिमित्त वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे आंबेडकरवादी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.सुहास हुपरीकर यांनी सांगितले.
संघटनेच्या माध्यमातून यापुढे महिला सक्षमीकरण, बेरोजगारांसाठी व्यवसायासाठी आवश्यक योजनांचा लाभ तसेच शोषित वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी यापुढे सर्वधर्मसमभाव ही संकल्पना आत्मसात करून भविष्यात वाटचाल करण्यात येणार आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मा.बबनराव कावडे यांनी केले.
शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच शहराच्या विकासासाठी आंबेडकरवादी सेना कटीबद्ध असेल परिणामी मोर्चे आंदोलने करावी लागली तरीही चालतील पण न्याय हक्कासाठी लढू असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते प्रा.शाहीद शेख यांनी केले.
यावेळी आंबेडकरवादी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.सुहास हुपरीकर, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मा.बबनराव कानडे, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते प्रा.शाहीद शेख, महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.गणेश कांबळे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा.सचिन आडसुळे, निसार खलिफा, मधूकर जाधव,सुरेल शेख, काजल कांबळे, निशा कांबळे, सलीम सनदी, अस्लम नाईकवाडे,विशाल कांबळे, सुमैय्या पत्रेवाली, शाहीन बारगीर,पुजा कांबळे, करिश्मा कांबळे,पुनम बिरांजे, पल्लवी बिरांजे,उषा कांबळे आदी पदाधिकारी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

