
जास्मिन शेख
जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर
घुग्घुस – आज दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी आई जिजाऊ अ हेल्पिंग हँड ऑर्गनायझेशन च्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव साहेब, व भादुले साहेब यांना निवेदन देण्यात आले. व या निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली की घुग्घुस येथील ACC चांदा सिमेंट कंपनी, हे राज्यातुन व परराज्यातून घाण कचरा आणुन ACC कंपनी मध्ये जाळत असुन ही ACC कंपनी वायु प्रदुषण नियमाचे उल्लंघन करत आहे. या घाण कचर्यामध्ये नालीतील प्लास्टिक, केस, वेस्ट मेडिकल, कपडे, चमडे, इत्यादी चा घाण कचरा कंपनीत जाळत असुन. या घाण कचराचा जवळ पास परीसरात खुप मोठ्या प्रमाणात घाण वास येतो. या वासामुळे नागरीकांना श्वास घेण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत आहे.
ह्या घाण कचरा प्लास्टिक चमडे केस वेस्ट मेडिकल जाळल्याने घुग्घुस परिसरा जवळ खुप मोठा प्रमाणात वायु दुषित झालेली आहे या दुषित वायु मुळे नागरिकांमध्ये टिबी,दमा, खोकला, व इतर आजारांना नाकारता येत नाही.
म्हणून हा घाण कचरा जाळने बंद करून ACC कंपनीवर सक्त कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुरेश मल्हारी पाईकराव आई जिजाऊ अ हेल्पिंग हँड ऑर्गनायझेशन च्या माध्यमातून करण्यात आली आहे.














