
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
श्री. संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळ ब्रम्हपुरी तसेच विदर्भ तेली समाज महासंघ ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रम्हपुरी नगरीत आयोजित वधू वर परिचय मेळावा तसेच स्मरणिका प्रकाशन सोहळ्यात समाजातील सामाजिक, शैक्षणिक तसेच वैदयकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा समाजभूषण पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, समाजकार्य, वैद्यकीय सेवा, जेष्ठ नागरिक, गुणवंत पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, सत्कारमूर्तीमध्ये जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या चंदा वैरागडे अध्यक्ष चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी, अध्यक्ष, रणरागिणी महिला नागरी सह पतसंस्था बाबूपेठ, संस्थापक अध्यक्ष, महिला बचत गट बाबूपेठ, अध्यक्ष, विदर्भ तेली समाज महासंघ, अध्यक्ष, तैलिक युवा/ महिला एल्गार संघटना चंद्रपूर इत्यादी पदावर कार्यरत असून समाजातील व्यक्तींना येणाऱ्या अडचणीला न्याय देण्याचे महान कार्य केले,तसेच वेळेप्रसंगी समाजातील व्यक्तीवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरून शासनाच्या विरोधात संघर्ष करून न्याय आणि मोबदला अनेकांना मिळवून देण्यात नेहमीच त्या अग्रेसर राहतात,बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे मोठे संघटन उभे करून त्यांना स्वावलंबी करून त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करून अनेकांचे संसार ऊपयोगी स्वप्न पूर्ण झाले, बचत गटातील महिलांची संख्या वाढत गेल्यामुळे त्यांनी महिलांकरिता रणरागिणी महिला पतसंस्था सुरू केली, त्यांनी दुर्बल ,पीडित घटकांकरिता केलेल्या अमूल्य कार्याची दखल घेऊन विदर्भ तेली समाज महासंघ तसेच श्री. संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळ ब्रम्हपुरी कडून मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.














