आकाश नरताम
जिल्हा प्रतिनिधी, वर्धा
झडशी – दि. ०१/०१/२०२४ ते ०८/०१/२०२४ पर्यत श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहेत. तसेच ०१/०१/२०२४ ला कलश स्थापना कथाव्यास भागवतकार नरेश महाराज दुधे यांच्या हस्ते तसेच उपस्थित गावकरी मडळी. यामध्ये भागवतकार नरेश महाराज दुधे दैनंदिन कार्यक्रम या मध्ये दररोज सकाळी काकडा आरती सकाळी ७ वाजता नंतर भागवतकथा सकाळी ९ वाजता, सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत, हरिपाठ सायं ५ वाजता तसेच दिंडी सोळाव्या व काल्याचे किर्तन दि. ०८/०१/२०२४ ला सकाळी ८ वा व महाप्रसाद सायं ५ वाजता सांगण्यात आली. यामध्ये महिला व पुरुष वृद्ध भावीक भक्तांनी या महाप्रसादसह लाभ घ्यावा. विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिरापासून तर गावातील चौकाचौकात मृदंगाच्या गजरात शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. सदर शोभायात्रेचे गावाच्या सर्व प्रमुख मार्गावर ठिक ठिकाणी उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले.
भागवत संच व हरिपाठ संच गायक अजाबराव बदुकले (दारव्हा), विणकेर व गायक – हरिष पारसे (घाटंजी बँजो व ऑर्गनवादक विनोद लोंढे (नेर), ऑक्टोपॅड वादक वैभव काळे (दिश्क्षस) झाकीरकार – रोषन होले (काटोल) तबला वादक – स्वप्नील कोल्हे, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान द्वारा श्रीमद् भागवत कथा सप्ताह आयोजन करण्यात आले आहेत.

