आदिवासी बांधवांनी जाणून घेतल्या शासकीय योजना
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर तथा आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमातींच्या योजनांची जनजागृती करण्यासाठी कोरपना आणि जिवती केंद्रामधे कलापथकाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्यात शैक्षणिक योजना, शेतीविषयक योजना, केंद्रवर्ती अर्थ संकल्प योजना अशा अनेक योजनांचा सामावेश होत असतो. कोरपना तथा जिवती केंद्रातील अनुसूचित जमातीच्या लोकांपर्यंत पथनाट्य, गोंडी गीत, गोंडी नृत्याच्या माध्यमातून शासकीय योजनांविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच व्यसनमुक्ती, कुपोषण, शिक्षण, कुर्माघर, पी एम जन गण योजना, या विषयावर प्रबोधन करण्यात आले.
कलापथकाचे सादरीकरण कोरपना व जिवती केंद्रातील भोलापेठार, आंबेझरी, भारी, टांगाळा, लांबोरी या गावात करण्यात आले असून कार्यक्रमाचे आयोजन मुरुंगानंथम एम., प्रकल्प अधिकारी, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. कलापथकाच्या कार्यक्रमात गावातील पोलीस पाटिल,नगर सेवक,सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामवासी
मोठ्या संख्येने उपस्थित होते. सादरीकरण राहुल पेंढारकर यांच्या आदिवासी कलापथक चमूने सादर केले.

