प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
दरवर्षी प्रमाणे याही तिसऱ्या वर्षी चंद्रपूर रत्न, चंद्रपूर गौरव तथा चंद्रपूर भूषण पुरस्कार चंद्रपूर येथून संचालित विदर्भातील प्रसिद्ध डिजिटल व्हिडिओ हिंदी वृत्तवाहिनी पार्थशर समाचार तर्फे वितरण करण्यात येणार आहे.
9 फेब्रुवारी 2021 रोजी चंद्रपूर येथून सुरू झालेल्या या डिजिटल व्हिडिओ हिंदी वृत्तवाहिनीने अवघ्या काही दिवसांतच विदर्भातील सर्वोत्कृष्ट हिंदी व्हिडिओ वृत्तवाहिन्यांपैकी एक म्हणून नावलौकिक मिळवला आहे. 9 फेब्रुवारी 2022 पासून आपल्या वर्धापनदिनानिमित्त समाजाप्रती असलेली जबाबदारी विशेष पद्धतीने पार पाडण्याच्या उद्देशाने प्रथमच वर्धापन दिनानिमित्त चंद्रपूर गौरव व चंद्रपूर रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. वाहिनीच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना पहिल्या महोत्सवात सुमारे 25 तर दुसऱ्या महोत्सवात 30 जणांना शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, व्यावसायिक, सांस्कृतिक, बालविभाग, फॅशन, तृतीय श्रेणी व इतर क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरविण्यात आले. चंद्रपुरात अवघ्या 2 वर्षात हा पुरस्कार प्रसिद्ध आणि महत्त्वाचा झाला.
या मालिकेत यंदाही तिसर्या वर्धापनदिनानिमित्त पार्थशर समाचारने या पुरस्कारांसाठी नामांकने मागवली आहेत. या वर्षी प्रथमच चंद्रपूर रत्न आणि चंद्रपूर गौरव पुरस्कारांसह चंद्रपूर भूषण पुरस्कार सुध्दा दिले जाणार आहेत.
जन्माने चंद्रपूरचे असलेले किंवा चंद्रपुरात कोणत्याही कामाशी संबंधित असलेले पुरुष, महिला आणि मुले या पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यास इच्छुक व्यक्ती आमच्या www.parthsharsamachar.in या वेबसाइटवर किंवा किंवा आमच्या ईमेल parthsharsamachar@gmail.com वर किंवा आमच्या मोबाईल क्रमांक 8669098703 वर आमच्याशी संपर्क साधू शकतात. नामांकनाची अंतिम तारीख 30 जानेवारी 2024 अशी जारी करण्यात आली आहे.

