श्रीगोंदा तालुक्याच्या विकासात शिवाजी बापूंचे मोठे योगदान..
भालचंद्र दरेकर
तालुका प्रतिनिधी,श्रीगोंदा
स्व. शिवाजीराव नागवडे तथा बापु यांच्या ९० व्या जयंती सोहळ्या निमीत्त आयोजित कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने तालुक्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रसंगी राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते अजित दादा पवार यांचा सन्मान करण्यात आला. बाबासाहेब भोस यांच्या हस्ते आ. संग्राम जगताप, आमदार बबनराव पाचपुते यांचा अनुराधा नागवडे यांनी सन्मान केला.
मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, मी सत्येला हपापलेला कार्यकर्ता नाही. मात्र स्व. शिवाजी बापू आणि आम्हीं सभागृहात एकत्र होतो. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी याठिकाणी येणे क्रमप्राप्त आहे. राज्याचे नेतृत्व, सहकार, राजकीय आणि समाजकारणी या जिल्ह्याने आणि तालुक्याने दिले आहेत. श्रीगोंदा तालुक्याच्या विकासात शिवाजी बापूंचा मोठा वाटा होता. बापूंच्या पुतळ्याच्या माध्यमातुन पुढील पिढीला प्रेरणा मिळावी. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सहकार क्षेत्रात बापूंचे योगदान मोठे असुन, राज्यातील सहकार क्षेत्रात बापूंनी नावलौकिक मिळवला आहे.
पुढे ते म्हणाले की, शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचणे गरजेचे आहे. पाणी नियोजन करने महत्वाचे आहे. प्रत्येकाला दर्जेदार घर, शिक्षण मिळणे आवश्यक आहे. यासाठी शासन प्रयत्नशील आहे. लोकांचे प्रश्न मिटले पाहिजेत. विकास कामं दर्जेदार होणे अपेक्षित आहे. नगर, काष्टी, दौंड रस्ता सिमेंटचा झालेत. नॅशनल हाइवे, रेल्वेचं जाळ, नवीन tecnology निर्माण केली. लोकांना सुविधा दील्या पाहिजेत. महिलांना अधिकची मदत करण्याचा निर्धार शासनाने केला आहे. असेही सांगितले.
बापूंनी गावच्या सरपंच पदापासून सुरूवात केली.. विकास सोसायटी, पंचायत समिती सदस्य, आमदार असा प्रवास केला.. सामान्य कार्यकर्त्यांनी जमिनीवर कामं केल्यास लोकं पाठीशी राहतात. बापूंनी कारखाना उभा केला म्हणजे ते दर्दी होते. त्यांनी जीव ओतून कामं केलं. बापू पूर्वी कम्युनिस्ट पक्षात होते त्यानंतर त्यांनी आयुष्यभर काँग्रेस मध्ये राहुन जबाबदारी पार पाडली. मोठा राजकीय प्रवास केला. कारखान्यामुळे परिसरात आर्थिक सक्षमता आली.
शिवाजी बापू नागवडे यांना यावेळी विनम्र अभिवादन करून, कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
प्रास्ताविक बाबासाहेब भोस यांनी केले.आभार सुभाष शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी आमदार बबनराव पाचपुते, नगर तालुक्याचे आमदार संग्राम भैया जगताप, दौंडचे माजी आमदार रमेशआप्पा थोरात, आमदार निलेश लंके, अनुराधाताई नागवडे, सीताराम गायकर, बाबासाहेब भोस, दिपकशेठ नागवडे, बाळासाहेब नहाटा, शुभांगी पोटे, दिपक शिर्के, ज्योतीताई खेडकर, बाळासाहेब दुतारे, कैलास पाचपुते, दादा पाटिल फराटे, शरद नवले, भगवान पाचपुते, अनिल ठवाळ इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

