prabodhini news logo
Home चंद्रपूर महिला सक्षमीकरणाकरिता ग्रामगीतेतील विचार अंगिकारावे- सुश्री रेखा बुराडे

महिला सक्षमीकरणाकरिता ग्रामगीतेतील विचार अंगिकारावे- सुश्री रेखा बुराडे

0
129

ऊर्जानगर वसाहत येथे महिला संमेलन संपन्न

सुविद्या बांबोडे
कार्यकारी संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपुर – आज महिलांचे जर सक्षमीकरण करायचे असेल तर ग्रामगीतेतील महिलोन्नती अध्याय वाचून आचारने गरजेचे आहे असे मत सुश्री रेखाताई बुराडे यांनी व्यक्त केले.
वंदनिय राष्टसंत तुकडोजी महाराज आणि वै.गाडगेबाबा यांच्या स्मृतीदिनानिमित्य ऊर्जानगर येथे आयोजित महिला संमेलनात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. शुभांगी बबनराव अनमूलवार गुरुदेव सेविका तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापिका तुकुम यांच्या अध्यक्षतेखाली महिला संमेलनाचे आयोजन केले होते.उदघाटिका जुही श्याम राठोड संचालिका व्हिजन कम्प्युटर इन्स्टिट्यूड कोराडी, प्रमुख वक्त्या सुश्री रेखा बुराडे महिलाश्रम प्रमुख तथा कार्याध्यक्षा आत्मनुसंधान भूवैकुंठ अडयाळ टेकडी, डाँ अर्चना निमकर डीन बी आय टी बल्लारपूर, रोशनी धांडे सामाजिक कार्यकर्त्या, वैशाली फुलकर पक्षी निरीक्षक व प्रमुख अतिथी लता वाढीवे पोलीस निरीक्षक दुर्गापूर, मंजुषा येरगुडे सरपंच ऊर्जानगर,रिना पांडे,सरस्वता धमाणे, शारदा रोडे, मायात बोबडे यांची उपस्थिती होती.
प्रमुख मार्गदर्शक डाँ अर्चना निमकर ,रोशनी धांडे, वैशाली फुलकर यांनी महिलांचे अधिकार व कर्तव्य यावर अमूल्य मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाच्या अनमूलवार यांनी शिक्षण आणि विद्यार्थ्यांचे नाते घट्ट कसे असावे व स्वतः वर आधी संस्कार करावे यावर सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुञसंचलन शीतल पोहनकर यांनी केले. प्रास्ताविक मुक्ता पोईनकर यांनी तर आभार कल्पना बगमारे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला मंडळाच्या सर्व महिला पदाधिकारी व सदस्यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here