prabodhini news logo
Home चंद्रपूर लाडबोरी येथे माजी विद्यार्थी व नवनिर्वाचित अधिकारी यांचा गुणगौरव सोहळा

लाडबोरी येथे माजी विद्यार्थी व नवनिर्वाचित अधिकारी यांचा गुणगौरव सोहळा

0
240

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी मधील जिल्हा परिषद उच्च प्राथ शाळा व शाळा व्यवस्थापन समिती लाडबोरी, भीम आर्मी संघटना सिंदेवाही यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा मधील माजी विध्यार्थी व नवनिर्वाचित अधिकारी कु.एकता प्रदीपजी नागदेवते हिचा शाळेच्या प्रांगणात गुण गौरव सोहळ्याचे आयोजन केले होते, जिल्हा परिषद शाळा मधील शिक्षक हे विध्यार्थ्यांचा पाया मजबूत करीत असतात,आणी पाया मजबूत झाल्याने पुढे भक्कम पणे विध्यार्थी यश संपादन करतात,एकता चे शिक्षण पहिली ते सातवी जिल्हा परिषद शाळेत झाले आपल्या गावच्या शाळेत शिकून मोठी अधिकारी झाल्याने शाळेतील शिक्षकवृदानी आपल्या माजी विध्यार्थीचा गुण गौरव करण्याचा कार्यक्रम आयोजित केला, या समारंभाला अध्यक्ष म्हणून डॉ. विनोद नागदेवते, व तुमराम सर नायब तहसीलदार सिंदेवाही हे होते. उदघाटक म्हणून विशाल सालकर वन परीक्षेत्र अधिकारी सिंदेवाही,विशेष अतिथी स्वप्नील कावळे नगराध्यक्ष सिंदेवाही, चंद्रकांत दलाल( म.न.रे.गा), बावनकर शिक्षण विस्तार अधिकारी, संतोष कुंटावार केंद्र प्रमुख गडबोरी,घनश्याम मांदाळे मुख्याध्यापक ,अक्षय चहांदे, तेजस वानखेडे, शंकर चिलबुले मंचावर विराजमान होते,सर्व प्रथम माजी विध्यार्थी एकता नागदेवते व पाहुण्यांना ढोल पथक व लेझीम च्या वाद्यात स्वागत करीत त्याना कार्यक्रम स्थळी आणण्यात आले,व स्वागत म्हणून विध्यार्थ्यानी फुलांचा वर्षाव केला सर्व पाहुण्यांचे स्वागत केल्यानंतर मंचावरील पाहुण्यांनी विध्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल व त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण होईल या बाबत सविस्तर माहिती दिली,नंतर एकता नागदेवते यांचा भीम आर्मी संघटना च्या माध्यमातून शाल व ट्राफी देऊन एकता नागदेवते चा गौरव केला या कार्यक्रमाचे सूत्र संचालन वसाके मॅडम तर आभार प्रदर्शन जितेंद्र गुरुनुले सर यांनी केले हा कार्यक्रमाच्या यशस्वी करण्याकरिता ठाकरे, राहंगडाले यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here