
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
पुणे दि. 26- रुग्ण हक्क परिषद, केंद्रीय कार्यालय येथे भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी दहा वाजता उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष, मा. सहा. पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. सामूहिक राष्ट्रगीत गायन करून उपस्थित मान्यवर व बालगोपालांना पेढे वाटून प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! अश्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, मा. सहा. पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, अपर्णाताई मारणे साठ्ये, रवींद्र चव्हाण, दिनेश गजधने, अभिजित हत्ते, रेश्माताई जांभळे, शारदा लडकत, फारुख तांबोळी, प्रफुल वाघमारे, आशिष गांधी, रजनीताई पाचंगे यांचेसह बालगोपाळ उपस्थित होते.














