prabodhini news logo
Home अमरावती प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

0
86

अमरावती प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

75 वर्षापूर्वी भारताने संविधान स्विकारले एक दूरदर्शी दस्तऐवज ज्याने भारताला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक बनण्यासाठी न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व नैतिक मुल्ये देवून आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सव संपूर्ण भारतात मोठ्या अभिमानाने आणि उत्साहपूर्ण देशभक्तीमय वातावरणात राज्यघटनेत नमूद केलेल्या मूल्यांप्रती वचनबद्धता नूतनीकरण करण्याच्या आनंदाने साजरा होत असतांना नेरपिंगळाई येथील श्री.विवेकानंद कन्या विद्यालयात सन्मा. संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. धनंजय माणिकरावजी तट्टे यांच्या अध्यक्षतेखाली तर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंजुषा देशमुख, मा. संभे, शिक्षक, वाय.जे. तट्टे, पी.बी. आडे, समीक्षा भोजने तथा एन्.बी. वाकोडे तथा धोंडे, कळसकर, सावरकर, खराशे, बडासे, खुरपडे तथा गावातील प्रतिष्ठित मंडळी ‘आदिंच्या प्रमुख आणि विद्यार्थ्यांच्या भरगच्च उपस्थित साजरा झाला. मा.अध्यक्षाच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. उपस्थित मान्यवरांना एम्.सी.सी. पथकाकडून शिस्तबद्ध मानवंदना देण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी वीर ‘ थोरपुरुषांना देशभक्ती गीतांनी शालेय परिसर देशभक्तमय करुन टाकला . बैठी मांस पिटी ‘Arobics’ डंबेल्स’ लेझीम अतिशय Osam ठरलेत. विद्यार्थ्यांनी आपल्या परफेक्ट कृतीने उपस्थितांची मने जिंकलीत. या शुभप्रसंगी Academic ‘ क्रीडा ‘विज्ञान’ कलेमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्यक्षांच्या हस्ते बक्षिसे वितरीत करण्यात आले. अतिशय शिस्तबद्ध सूनियोजित कार्यक्रम हा देशाभिमान जागृत ठेवणारा ठरला. याप्रसंगी कु. सेजल सुजुसे ‘कु. आरती पांडे, सपकाळ आदिंनी प्रसंगी अप्रतिम भाषण दिलेत . मुख्याध्यापिका मंजुषा देशमुख यांनी 26 जाने. प्रजासत्ताक दिनाला बळकटी आणण्याकरिता शालेय विद्यार्थ्यांनी कटिबद्ध असावे. हा संदेश दिला. तर अध्यक्षीय भाषणातून डॉ. धनंजय तट्टे सरांनी विद्यार्थ्यांना अत्यंत मौलिक विचार प्रसंगी सांगितले. शाळेचे ‘ विद्यार्थ्यांचे आणि शिक्षक ‘ शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल कौतूक केलेत. आपण हा महत्वाचा टप्पा साजरा करीत असतांना उद्देश आणि जबाबदारीची जाणीव प्रत्येकानेच स्विकारावी. मौलिक संदेश दिलात. शिस्तबद्ध ‘नियोजनबद्ध’ उत्कृष्ट अशा भरगच्च कार्यक्रमांचे यशस्वी सूत्रसंचालन पी.बी.आडे सर यांनी तर सर्वांचे आभार वाय.जे. तट्टे यांनी केलेत .आणि कार्यक्रमाचे शेवटी एन.बी .वाकोडे यांनी प्रसाद वितरीत केलेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तथा पुष्पा सावरकर विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here