परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
परभणी- आज मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी बसलेल्या समर्थनासाठी परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध गोसेवक समाजसेवक मराठा सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी विविध आंदोलन निवेदन दे देऊन सहभाग नोंदवला पण बरेच लोक आत्महत्या करत होते आत्महत्या न करता जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन देऊन विवाह न करण्याचा निर्णय व डोक्याचे केस कापण्याचा निर्णय घेतला होता आज राज्य व केंद्र सरकार यांनी मराठा आरक्षण कुणबी मधून जाहीर करण्यात आले म्हणून ही संकल्पना डोक्याचे केस कापून पूर्ण करण्यात आली याप्रसंगी मराठा साखळी उपोषणा चे मुख्य परभणी जिल्हा समन्वयक चे किशोर रनेर मराठा क्रांती मोर्चा आंदोलन समन्वयक चे समान गजानन जोगदंड अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे मराठा समाजाच्या उद्योगासाठी माहिती प्रमुख मराठा व्याख्याते विनोद अण्णा भोसले मराठा समाजाचे कार्यकर्ते सूर्यकांत मोगल पाटील ओबीसी समाजाचे प्रतिनिधी आयुर्वेदिक डॉ. गोविंद कामटे सेलूकर नितीन देशमुख राजू शिंदे बलसेकर तसेच कृष्णा जेंट्स पार्लर चे संचालक विकास गुंगे व संजय राव गुंगे बहुसंख्य मराठा क्रांती मोर्चा चे पदाधिकारी उपस्थित होते. गोष्ट मराठा सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी आज कटिंग करून डोक्याचे केस कापून संकल्पना पूर्ण केली याबद्दल सर्व परभणी जिल्ह्याच्या वतीने मराठा समाज बांधवांच्या वतीने अभिनंदन व स्वागत करण्यात येते सर्व राष्ट्र जन फाउंडेशन परभणी वीर वारकरी सेवा संघ परभणी अखिल भारतीय मराठा विकास मंच परभणी मराठा सेवा मंडळ परभणी संभाजी ब्रिगेड दयावान सरकार परभणी समाज हित अभियान प्रतिष्ठान वृत्तपत्र विक्रेते संघटना परभणी राम कृष्ण हरी अन्नदान छत्रालय परभणी राष्ट्र जन जीसीबी लेव्हलिंग ट्रॅक्टर चालक – मालक संघटना परभणी जलमित्र संघटना परभणी स्वच्छता ग्रुप परभणी सर्वांच्या साक्षीने आज संकल्पना पूर्ण करेल केल्याबद्दल चे मनःपूर्वक अभिनंदन व आभार राज्य सरकार व केंद्र सरकारचे जाहीर धन्यवाद स्थळ शिवशक्ती बिल्डिंग श्रीकृष्ण मेन्स पार्लर येथे दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी दुपारी एक वाजता अशी माहिती पत्रकार द्वारे मराठा सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे दिले.

