सुराज्य निर्माण सेना पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी भागवत भुजबळ यांची नियुक्ती

0
58

लातूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

लातूर – दि. सुराज्य निर्माण सेना पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी भागवत भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली.बार्शी रोड येतील गणेश कॉम्प्लेक्स येथे बैठक संपन्न झाली.यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवानंद मठपती हे अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहशिक्षक वीरभद्र मठपती होते. यावेळी जिल्हाध्यक्ष म्हणून भागवत भुजबळ, उपाध्यक्ष बालाजी नागीने, शहराध्यक्ष बालाजी गिरी यांची नियुक्ती करून नियुक्तीपत्र देण्यात आले.
मार्गदर्शन पर बोलताना प्रदेशाध्यक्ष शिवानंद मठपती म्हणाले सध्याच्या प्रस्थापित पक्षाला जनतेचे काहीच देणे घेणे नाही, “खुर्चीसाठीच प्रयत्न अहोरात्र” अशी अवस्था झाली आहे. बोलताना ते पुढे म्हणाले महागाईने कळस गाटला आहे, बेरोजगारीने उच्चांक गाटला आहे अशा परिस्थितीत जनसामान्याचे व तळागाळातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सुराज्य निर्माण सेना कटिबद्ध आहे. वीरभद्र मठपती म्हणाले सामान्य जनतेला एक पर्याय हवा आहे आणि तो पर्याय सुराज्य निर्माण सेना पक्ष आहे.
जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल भागवत भुजबळ म्हणाले सुराज्य निर्माण सेना या पक्षात मी प्रवेश केला आहे आणि या पक्षाचे कार्य तन मन आणि धन लावून सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी सज्ज आहे.
यावेळी बिराजदार लक्ष्मण, दगडू अंडरगुळे, सिद्धेश्वर बिराजदार, संजय भुजबळ, गजानन लखादिवे, स्वप्निल हंडरगुळे, वामनराव ईनकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार लहू शिंदे यांनी केले तर शेवटी आभार संजय भुजबळ यांनी मानले यावेळी अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here