prabodhini news logo
Home उदगीर पत्रकारावर प्राणघातक हल्ला

पत्रकारावर प्राणघातक हल्ला

0
115

गुन्हा नोंद करण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

विठ्ठल पाटील
उदगीर प्रतिनिधी

पत्रकारावर प्राण घातक हल्ला करणाऱ्यावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत तात्काळ गुन्हा नोंद करावा यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा शाखा लातूरच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
काटगाव तालुका लातूर येथील जिल्हा परिषद शाळेतील काही विद्यार्थ्यांना इन्स्पेक्शनच्या नावाखाली अनेक वेळा संडास बाथरूम साफ करून घेतले.
सदर प्रकरण विद्यार्थ्यांच्या पालकावर दबाव आणून मिटवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा जाब विचारण्यासाठी विद्यार्थ्यांचे पालक व क्राईम रिपोर्टर चे संपादक धनराज वाघमारे गेले असता मुख्याध्यापक यांनी अरेरावीची भाषा करून गावची इज्जत बाहेर काढतोस का म्हणून मुख्याध्यापक व गावातील गावगुंडांनी पत्रकारावर प्राण घातक हल्ला केला. पत्रकार धनराज वाघमारे हे सिव्हील हॉस्पिटल लातूर येथे ऍडमिट आहेत.
◆ सदर घटनेची तात्काळ चौकशी करून पत्रकार धनराज वाघमारे व कॅमेरामन यांच्यावर प्राण घातक हल्ला करणाऱ्या गावगुंडावर तात्काळ पत्रकार संरक्षण कायदयाअंतर्गत गुन्हा नोंद करावा.
◆ पीडित मुलींना वारंवार संडास बाथरूम साफ करण्यास भाग पाडून शिक्षण विभागास काळे फासणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांना तात्काळ सेवेतून निलंबित करून फौजदारी कारवाई करावी.
◆ पीडित मुलीच्या पालकास दडपशाही करत जबरदस्तीने आमची तक्रार नाही असा जाब नोंदवून घेणाऱ्या वरिष्ठ अधिकारी (बी ओ) यांना सेवेतून तात्काळ निलंबित करावे.
◆ मुलीच्या पालकांची तक्रार नोंदवून घेणाऱ्या लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक व भाग जमादार यांची तात्काळ बदली करावी.
◆ दहशत माजवणाऱ्या गावगुंडावर काय एम पी डी ए अंतर्गत कारवाई करावी.
◆ गावगुंडांनी दडपशाही खाली ठेवलेल्या पालक व मुलींचे पुनर्वसन करावे.
सदर मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी लातूर, पोलीस अधीक्षक लातूर, व सीईओ यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा शाखा लातूर च्या वतीने देण्यात आले.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष लहूकुमार शिंदे, उपाध्यक्ष महादेव पोलदासे, प्रसिद्धीप्रमुख संतोष सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार शिरीषकुमार शेरखाने, कार्याध्यक्ष रियज शेख, ॲड. राजकुमार दाभाडे, संपादक दिनेश गिरी, आनंद दनके, लिंबराज पन्हाळकर, अमोल इंगळे, साईनाथ घोणे, अमोल घायाळ, नेताजी जाधव, कृष्णा कोल्हापुरे, नरसिंगे व्यंकटेश, अहिल्या कस्पटे, विजय गायकवाड आदींच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here