हाळी-हंडरगुळी ग्रा.पं.चा ठरावा येताच गतिरोधक बसवणार तसेच योग्यवेळी अतिक्रमण काढणार – एम.एम.पाटील सा. बां. विभाग उदगीर

0
45

उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज

हाळी-हंडरगुळी या 2 गावातुन नांदेड बिदर हा राज्यमार्ग गेला असुन,या मार्गावर एकही गतिरोधक नसल्याने कांहीजण वाहने अतिवेगात चालवत असतात.यामुळे तसेच वाढलेल्या अतिक्रमणामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असुन या रोडवर 4 ठिकाणी गतिरोधक बांधावेत. अण् अतिक्रमण हटवावेत. या जनतेच्या म्हत्वाच्या मागण्या आहेत.व याबाबत अनेकदा पेपरातुन सचिञ अशा बातम्याही आल्या आहेत.म्हणुन या दोन्ही ग्रा.पं.नी तसा ठराव द्यावा.मग सा.बां. खाते अवश्य तेथे गतिरोधक बसवणार.तसेच ग्रा.पं.तर्फे जागो-जागी “नो पार्कींग व नो हाॅकर्स झोन” असे बोर्ड लावल्यास पोलीस खाते योग्य ती दखल घेईल.तसेच कांही महिण्यापुर्वी काढुनही पुन्हा त्याच जागेवर त्याच लोकांनी तसेच जि.प. शाळेच्या जुन्या व मेन गेट समोरचे माॅंस विक्रीसह सर्व अतिक्रमण साबां योग्यवेळी काढणार. अशी माहिती सा.बां.विभाग,उदगीरचे कार्यकारी अभियंता पाटील एम.एम.यांनी सदर प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

हाळीहंडरगुळी या 2 गावातुन गेलेला नांदेड-बिदर हा राज्यमार्ग तेलंगना, आन्ध्रा, कर्नाटक या परराज्यांना जोडलेला असल्याने तसेच उदगीर शहरानंतर तालुक्यात सर्वात मोठी व प्रसिध्द बाजारपेठ व गुरांचा बाजार हा हंडरगुळीत असल्याने आणि शाळा, काॅलेज, बॅंका, तलाठी, पोलीस चौकी आदी कार्यालये याच रोडलगत असल्याने या रोडवर वाहणांसह पद- चा-यांची मोठी गर्दी असते.त्यातच या रोडवर एकही गतिरोधक नसल्याने कांही वाहनचालक अतिजोरात गाडी चालवत असल्याने अपघाताची भिती वाटते.आणि भरिसभर म्हणुन की काय या रोडलगत दुचाकी वाहने वेडी वाकडी उभारलेली दिसतात.तर हात गाडे व सा.बां.खात्याने बांधलेल्या नालीवर व पुढे अनेकांनी पुन्हा मोठ- मोठे अतिक्रमण केल्याने हा राज्य मार्ग धोकादायक बनला असुन वाढते अतिक्रमणामुळे व गतिरोधकाभावी कधी पण अपघात होऊ शकतो.अशी भीती सुज्ञ हाळीहंडरगुळीकर बोलुन दाखवितात.म्हणुन याची परवाच सचिञ कांही पेपरात बातमी आली. तरीपण याकडे प्रशासन का ? लक्ष देत नाही. अपघातात एखाद्याचा जीव गेल्यावर संबंधित प्रशासन वरील मागण्यांचा विचार करणार का?असे प्रश्न सुज्ञ हाळी-हंडरगुळीकरामध्ये चर्चीले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here