prabodhini news logo
Home आर्थिक अंतरगांव येथे ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडून मृतांच्या कुटुंबाना आर्थिक मदत

अंतरगांव येथे ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडून मृतांच्या कुटुंबाना आर्थिक मदत

0
243

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

सिंदेवाही तालुक्यातील अंतरगाव येथील सखाराम मेश्राम यांच्या पत्नी बेबीबाई सखाराम मेश्राम (वय ५५) यांचे आकस्मित निधन झाल्याने घरच्या कुटुंबावर दुःखा चा डोंगर कोसळले .घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची असल्याने फार मोठी परिस्थिती निर्माण झाली. आपला उदर निर्वाह कसा करायचं या विवेचनात असताना मेश्राम यांना आधाराची गरज ओळखुन आणि सखाराम मेश्राम यांना कोणतेही अपत्य नसल्याने त्यांची दखल घेऊन विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवर यांच्या कडून आर्थिक मदत देण्यात आली.

आर्थिक मदत देते वेळी दिपाली ढाले सरपंच अंतरगांव, प्रविण कामडी उपसरपंच ग्रा. पं. अंतरगांव, शेखर मामीडवार तंटामुक्त समिति अध्यक्ष, प्रविन कामडी सामाजिक कार्यकर्ता अंतरगांव, हितेश कामडी, शेख मंहमद, वासुदेव ढाले, आदि उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here