बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
8788979819
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील 17 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या मजबुतीकरण कामास भाजपाचे नेते आ रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून मान्यता मिळाली असून या कामामुळे त्या त्या भागातील शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.
रस्त्या अभावी अनेक शेतकऱ्यांना सातत्याने अडचणीला तोंड द्यावे लागत होते शेतकऱ्याची गरज लक्षात घेऊन भाजपाचे नेते आ रमेशआप्पा कराड यांनी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीप भुमरे साहेब यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला केलेल्या पाठपुराव्यामुळे मतदार संघातील रेणापूर तालुक्यात साडेनऊ किलोमीटर आणि भादा सर्कल मध्ये साडेसात किलोमीटर अशा एकूण 17 किलोमीटर रस्त्याच्या मजबुतीकरण कामाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभागातून मातोश्री ग्रामसमृद्धी शेत तथा पांणद रस्ते योजनेअंतर्गत 23 फेब्रुवारी 2024 रोजी च्या शासन निर्णयानुसार मंजुरी मिळाली आहे.
17 किलोमीटर रस्त्याच्या कामात पानगाव येथील 3 किलोमीटर मोहगाव 1 किलोमीटर घनसरगाव 1 किलोमीटर मालेगाव 4.5 किलोमीटर आणि भादा सर्कल मधील भादा येथे 6 किलोमीटर आणि भेटा येथील 1.5 किलोमीटर कामाचा त्यात समावेश असून अनेक वर्षापासून अडचण ठरलेल्या या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाल्याने भाजपाचे नेते आ रमेशआप्पा कराड यांचे त्या त्या गावातील भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले आहेत

