
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
महाशिवरात्री यात्रे निमित्य पेरजागड,सोनापूर ता.नागभीड येथील विदर्भात प्रसिद्ध असलेले सातबहिणी देवस्थान येथे दि.०८/०३/२०२४ व ०९/०३/२०२४ ला सतत दोन दिवस चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा नेते,तळोधी-गोविंदपूर जि.प.क्षेत्राचे जनसेवक तसेच जय श्री.साई बिल्डर्स ब्रम्हपुरी/नागपूर चे संचालक दिवाकर निकुरे यांच्या कडून यात्रेला येणाऱ्या सर्व भाविक-भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करून वितरण करण्यात आले.
याबद्दल सातबहिणी देवस्थान कमिटीने दिवाकर निकुरे यांचे आभार व्यक्त केले.
या कार्याच्या यशस्वीतेसाठी पळसगाव(खुर्द)चे सरपंच बालू सिद्धमशेट्टीवार,गिरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सागर खोब्रागडे,युवा कार्यकर्ते श्याम बागडे,मुकेश रामटेके व इतर अन्य कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.















