रत्नापुर ग्रामपंचायत सरपंच पदी नजरी मेश्राम यांची निवड

0
496

कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर ग्रामपंचायतीत १५ सदस्यीय असून मागील ८ महिन्यापासून सरपंच पद रिक्त असलेल्या सरपंच पदाच्या निवडीत कॉग्रेस गटाच्या नजरी आनंद मेश्राम सरपंचपदी वर्णी लागल्याने रत्नापुरच्या कॉग्रेस पक्षात उत्साह निर्माण झाला आहे.

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर ग्रामपंचायंत १५ सदस्यीय ग्रामपंचायत असून तालुक्यातुन मोठी ग्रामपंचायत म्हणून पाहिली जाते. मागे झालेल्या ग्राम पंचायत निवडणूकीत भाजपा गटाचे ९ तर कॉग्रेस गटाचे ६ सदस्य निवडून आले होते .भाजप गटाकड़े स्पष्ट।बहुमत होते. त्यावेळी भाजपा गटाच्या कविता सावसाकडे सरपंच पदावर आरूढ झाले होते . मात्र ग्रामपंचायत च्या कविता सावसाकड़े सरपंचावर ८ महिन्यापूर्वी अविश्वास ठराव मंजुर झाल्याने हे सरपंच पद रिक्त होते. आणि प्रभारी सरपंच म्हणून अशोक गभणे यांच्या कड़े धुरा आली.८ महिन्यानन्तर सरपंच पदाचे निवडणुकीसाठी गुरुवार.दि.१४/०३/२४ ला सभा बोलावली होती. या प्रकियेवेळी सरपंच पदासाठी नजरी आनंद मेश्राम व उषा ईश्वर धारणे यांनी अर्ज केला. रत्नापूर ग्रामपंचायत चे सरपंच पद अनुसुचीत जमाती महीला राखीव असल्याने दोन महीलांचे नावे प्रशासकीय अधिकाऱ्यासमोर आली. मात्र सरपंच पदासाठी अर्ज केलेल्या एका महीला सदस्याकडे काष्ट व्हॅलीडिटी नसल्याने फार्म रिजेक्ट झाले. आणि दि.१४/०३/२४ ला कोरम पूर्ण होवू न शकल्याने सभा तहकुब करण्यात आली .तहकूब झालेली सभा शुक्रवार दि.१५/०३/२४ ला ग्रामपंचायत।सभागृहात आयोजित करण्यात आली. या सभेच्या प्रसंगी ग्राम पंचायत सदस्य कांग्रेस गटाचे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होती तर अन्य सदस्यांनी सरपंच निवड सभेला पाठ फिरवले. रत्नापुर ग्रामपंचायत सरपंच निवडीवेळी अध्याशी अधिकारी यांच्या उपस्थितीत सरपंचपदी नजरी मेश्राम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नजरी मेश्राम यांची सरपंच पदी निवड झाल्याने रत्नापुर येथील कॉग्रेस पदाधिकारी व सदस्य तसेच कार्यकर्तानी नवनिर्वाचित सरपंच यांचे अभिनंदन केल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here