बोराळे या शाळेत गावचे उपसरपंच कुशन चिभडे यांनी त्यांची मुलगी शिवानी हिचा १० वा वाढदिवस शाळेतील मुलांसामवेत केक कापून, लेखन साहित्य व खाऊ वाढदिवस साजरा…
शाळेतील मुलांना लेखन साहित्य व खाऊ मिळाल्याने सर्व मुलांचे चेहरे अगदी आनंदाने फुलून गेले.
गणेश कलिंगडा
जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर – आज दिनांक १५/०३/२०२४ वार शुक्रवार रोजी जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोराळे या शाळेत गावचे उपसरपंच कुशन चिभडे यांनी त्यांची मुलगी शिवानी हिचा १० वा वाढदिवस शाळेतील मुलांसामवेत केक कापून वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित बोराळे गावचे उपसरपंच कुशनजी चिभडे यांनी शाळेतील मुलांना ऐन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लागणारे उपयुक्त लेखन साहित्याचे वाटप करून खाऊचे वाटप केले. शाळेतील मुलांना लेखन साहित्य व खाऊ मिळाल्याने सर्व मुलांचे चेहरे अगदी आनंदाने फुलून गेले.
वाढदिवस म्हंटल तर आपल्या सर्वांचा एक गोष्ट आठवते का वाढदिवस पार्टी,खाना,पिना,मस्ती,फोरायला मित्रानं बरोबर नाच गाणी अशी धमाल असते पण बोराळे गावचे उपसरपंच कुशनजी चिभडे यांनी शाळेतील मुलांना ऐन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लागणारे उपयुक्त लेखन साहित्याचे वाटप करून खाऊचे वाटप केले व त्यांची मुलगी शिवानी हिचा १० वा वाढदिवस शाळेतील मुलांसामवेत केक कापून वाढदिवस साजरा केला. हा आदर्श सर्व समाजाणे घेऊन वाढदिवसाचा वायफळ खरच न करता कुशन चिभडे यांनी दिलेला संदेश खरच कौतुका स्पद आहे.
सदर वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक संतोष गवळी यांनी कुमारी शिवानी हिला शुभेच्छा देतांना सांगितले की, प्रत्येक विद्यार्थ्यांची जन्मतारीख आम्हांला माहिती असते पण, सदर मुलांच्या पालकांनी आपल्या मुलाचा वाढदिवस शाळेत येऊन साजरा केला तर इतरही मुलांना त्याचा प्रतक्ष आनंद अनुभवता येईल. सदर कार्यक्रम प्रसंगी शाळेतील शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, बचत गट महिला उपस्थित होत्या.

