गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राकरिता काँग्रेस कडून डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी

0
132

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणूगोपाल, राज्य प्रभारी रमेश चेन्नीथलाजी, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते ना. विजय वडेट्टीवार, विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवार निवड समिती ने गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राकरिता काँग्रेस कडून डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले.
आगामी काळात गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रात डॉ. नामदेव किरसान यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाचा खासदार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्ष श्रेष्ठी समोर केला. यावेळी राज्याचे विरोधी पक्ष नेते ना. तथा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, माजी खास. मारोतराव कोवासे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आम. नामदेव उसेंडी, माजी आम. आनंदराव गेडाम, माजी आम. पेंटारामा तलांडी, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, माजी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, नलेंज मरस्कोल्हे, राकेश नागरे सह इतर पदाधिकारी दिल्ली येथे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here