
नुकसान ग्रस्त कुटुंबाला त्वरीत मदत देण्यात यावी
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील रहिवासी यशवंत सोमा बन्सोड यांचे रहाते कौलारू घर दि.२ एप्रिल ला अंदाजे रात्रों ८.३० वाजताच्या सुमारास घराला अचानक आग लागल्याची घटना घडली असून यशवंत सोमा बन्सोड यांचे लोखो रूपयाचे नुकसान झाले आहे. रत्नापुर येथे डोंगरवार व्यक्तीकडे कार्यक्रम असल्याने त्या कार्यक्रमाला सर्व कुटुंब गेले होतेआणि घरी कुनीच नव्हते अशातच घराला अचानक आग लागली आणि घरातून धूर निघत असल्याचे शेजाऱ्याच्या लक्षात आल्याने घराचे दरवाजाचे कुलूप तोडून आग विझविण्याचा प्रयत्न केला असता आगीने रौद्र रूप धारण केल्याने आगीत सर्व घरातील वस्तु जळून खाक झाले होते.गावातील लोक जमा होउन आग विझविन्यात आली.या आगीत जवळपास लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज असल्याने बन्सोड नामक परिवारावर खुप मोठे संकट कोसळले आहे. सदर बंसोड़ परिवारावर उपासमारीची वेळ आली असून घरातील कपडे, अन्न धान्य, इलक्क्ट्रिक वस्तु, भांडे जिवनावश्यक वस्तु पुर्ण जळून खाक झाल्या सदर आग कशाने लागली हे जरी कळू शकले नसले नाही सदर घटनेची माहिती होताच महसुल विभागाकडून पंचनामा करण्यात आलाअसून नुकसान ग्रस्त यशवंत बंसोड कुटुंबाला त्वरीत मदत देण्यात यावी अशी मागणी रत्नापुर नागरिका कडून होत आहे.














