
घरोघरी पत्रके वाटून व सदिच्छा भेट देत मुनगंटीवारांना जिंकून देण्यास जनतेला केले आवाहन
प्रणित तोडे
व्यवस्थापक संपादक
प्रबोधिनी न्युज
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या निवडणुकी संदर्भाच्या प्रचाराची सुरूवात मंगळवारला सायंकाळी विठ्ठल मंदिर प्रभागातून करण्यात आली आहे.
प्रचाराच्या सुरूवातीला विठ्ठल- रुक्मिनीचे दर्शन घेऊन सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयासाठी साकळे घालण्यात आली. त्यानंतर विठ्ठल मंदिर प्रभागात घरोघरी पत्रके वाटून व सदिच्छा भेट देत सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय प्राप्त करून देण्यास जनतेला आवाहन केले.
यावेळी भाजपा बाजार मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार,माजी नगरसेविका संगीता खांडेकर,भाजयुमो महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार,भाजयुमो महानगर जिल्हा सचिव प्रणय डंबारे,राहुल अंबिरवार,किरण ठाकरे,निलेश रामेडवार,मुन्ना मोसमवार ,वैभव रामेडवार,राहुल पावडे,निलेश दंडले,सावन कालीवाले,निशिकांत महागावकर, छोटू दळणे,नयन डोईफोडे,शुभम बोभळे,सुरेश मुठ्ठावार , नितीन येलमुले,यशवंत खडसे,तेजस रामेडवार, सोनू पेटकर,विनय रौतुलवार,हर्षल निखाडे, नवनीत मिश्रा,हर्षल रपरत्तीवार,श्रेयस तुराणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.














