prabodhini news logo
Home चंद्रपूर टोल नाक्याच्या व्यवस्थापनावर खुणाचा गुन्हा दाखल करा- राजू झोडे

टोल नाक्याच्या व्यवस्थापनावर खुणाचा गुन्हा दाखल करा- राजू झोडे

0
230

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी,
चंद्रपुर

बल्लारपूर विसापूरच्या दरम्यान बीओटी तत्वावर असलेल्या टोल नाका व्यवस्थापनेच्या वसंबंधित अभियंत्याच्या गलथान कारभारामुळे एका शिक्षिकेला आपला जीव गमवावा लागला.या याअपघाताला टोल व्यवस्थापनच जबाबदार असल्याचे आरोप करून टोल नाक्याच्या व्यवस्थापनावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी दिला आहे.
नुकतेच येथील शिक्षिका जीवने मॅडम दहावीचे पेपर मॉडिटर कडे परत करून आपल्या गावाला परत जात असताना टोल नाक्याच्या व्यवस्थापनाने गरज नसताना टोल नाका परिसरात नव्याने ब्रेकर बनवलेले नियमानुसार त्या ब्रेकरवर कोणत्याही प्रकारचे ब्रेकर असल्याचे सावधगिरी चे उपाय केले नसल्याने सदर अपघात झाला असून याची चौकशी करून टोलनाका व्यवस्थापन व संबंधित अभियंतावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून दोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल त्वरित करण्यात यावा अन्यथा टोल फ्री आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदार बांधकाम विभागावर राहील असा इशारा उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here