
माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत समर्थकांसह केला पक्षप्रवेश…!
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
गेल्या अनेक दिवसांपासून चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेऊन पक्ष वाढविणारे काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) दि.०७/०४/२०२४ ला आपल्या समर्थकांसह ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये खासदार सुनील मेंढे यांच्या साकोली येथील निवासस्थनी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे इतरही नेते उपस्थित होते.
निकुरे यांनी मागील १ वर्षांपासून ते संपूर्ण चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाचा काम करीत होते,परंतु काँग्रेस मधील प्रचंड गट-बाजीच्या राजकारणाला कंटाळून निकुरे यांनी आपले काम पूर्णपणे बंद केले होते,त्यानंतर त्यांच्या नेहमीच चर्चा होतं असत की निकुरे आता कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घेणार अशी चर्चा नागरिकांमध्ये होती.परंतु आता या सर्व चर्चांना पूर्णविराम देत दिवाकर निकुरे यांनी शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला आहे.














