व्यापारी असोसिएशनच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन सोहळा संपन्न

0
341

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि,
चंद्रपूर

सिंदेवाही – व्यापारी असोसिएशन सिंदेवाही लोनवाही चे वतीने मंगळवार 9 एप्रिल 24 ला गुढीपाडवा सणाचे निमित्याने नागरिकांसाठी पाणपोई चे उद्घाटन अध्यक्ष दिलीप दुस्सावार यांचे शुभ हस्ते सोहळा संपन्न झाला.

शहरातील जुना बस स्थानक परिसरात व्यापारी असोसिएशन सिंदेवाही -लोनवाहीचे वतीने तापमानाची ऊन,अत्यंत गर्मी आणि या गर्मीत आपल्या नागरिकांची, ग्राहकांची तहान भागविण्याकरिता समाजसेवेचा ,जनसेवेचा एक छोटासा उपक्रम, गुडीपाडवा सणाचे औचित्य साधून मंगळवार दिनांक 9 एप्रिल 2024 शुभमुहूर्तावर पाणपोईचे उद्घाटन संपन्न झाले आहे . शहरातील मुख्य मार्गावरील मेहुल पटेल यांचे किराणा दुकान समोर जुना बस स्थानकावर उन्हाची तीव्रता जाणवू लागल्याने नागरिकांना थंड कॅन पिण्याच्या पाण्याची पाणपोई सुरू करण्यात आली आहे.
या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष दिलीप दुस्सावार, आलोक सागरे, सचिव श्याम छत्रवाणी, संदीप बांगडे, अनुप श्रीरामवार, मेहुल पटेल, मयूर सूचक, चेतन सूचक, अविनाश चंबुलवर ,रमेश पित्तुलवार, सुधीर कुडकेलवर , बाबाजी भवानी, व्यापारी कार्यकरणी,व्यापारी बंधू, नागरिक पाणपोई उद्घाटन सोहळा कार्यक्रम स्थळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here