
घुग्गूस काँग्रेसचे पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन
घुग्गूस प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
भाऊ – बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारे वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात घुग्गूस शहर काँग्रेस तर्फे काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, ज्येष्ठ नेते जयंता जोगी, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सादलावार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार नेते दिलीप पिटटलवार,आप नेते अमित बोरकर,ज्येष्ठ नेते बाबा कुरेशी,मुन्ना भाई लोहानी,तिरुपती महाकाली,महिला नेत्या यास्मिन सैय्यद,पदमा त्रिवेणी,दुर्गा पाटील,सुजाता सोनटक्के,संध्या मंडल,शिल्पा गोहिल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.















