परभणी प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
परभणी – येथे जुना पेडगाव रोड बालाजी आयुर्वेदिक निसर्गउपचार केंद्र शाखा क्र:-3 येथे हिंदू मुस्लिम बांधवांने इफ्तार पार्टी साजरी केली.
रामकृष्ण हरी मित्र मंडळ संचालित वीर वारकरी सेवा संघ प्रणित राष्ट्रजन फाउंडेशन च्या वतीने रमजान महोत्सवाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी देऊन हिंदू- मुस्लिम भाई-भाई राष्ट्रीय एकोपा राहण्यासाठी आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मुस्लिम समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यात सय्यद नजमुल हसन अलीग (जमाते-ए -इस्लामचे सक्रिय कार्यकर्ते ) समाजसेवक शेख इर्शाद,रुग्णमित्र शेख सरफराज अब्दुल मजिद,आयुर्वेदिक डॉ.सय्यद अनवर , डॉ.सय्यद जाहेद अली,अब्दुल मोईज,वाहन चालक रफिक शेख,आयान शेख,वजाहद अली खान,वरील सर्वांना गौरव सन्मानपत्र देऊन हार गुलाबाचे फुल देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला
प्रमुख पाहुणे भीमाकोरेगाव मित्रमंडळाचे संदीप वायवळ,वीर भगतसिंग मित्र मंडळ परभणी संस्थापक व अध्यक्ष हरदिप सिंग बावरी,प्रदीप गडदे कार्यक्रमाचे संयोजक राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सल्लागार डॉ.गोविंद कामटे सेलूकर कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी प्रस्तावित मध्ये मराठी नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडव्या आणि रमजान महोत्सव एकत्र साजरी करून हिंदू मुस्लिम भाई भाई एकच नारा मुबारक आधी बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ.गोविंद कामटे यांनी समाजा-समाजात राष्ट्रीय एकात्मता राहण्यासाठी अशा सर्वधर्मीय कार्यक्रमाची आवश्यकता आहे असे मार्गदर्शनपर भाषण केले.
अशी माहिती रमजान ईद महोत्सव हिंदू मुस्लिम भाई भाई कार्यक्रम प्रमुख धार्मिक सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.

