
हंडरगुळीत शांतता समितीची बैठक संपन्न.
लातूर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
हंडरगुळी – या एप्रिल मध्ये विविध धर्मीयांचे सण, उत्सव आहेत.आणी या दरम्यान जर कोणी डी.जे.लावून कायदा हातात घेतला तर त्या व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल.असा स्पष्ट इषारा सपोनी. भिमराव गायकवाड यांनी दिला आहे. ते गुडी पाडवा, श्रीराम नवमी,ईद, महावीर जयंती, डाॅ.अंबेडकर जयंती व लोकसभा निवडणुक यांच्या संदर्भात पोलीस चौकी हंडरगुळी येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकी मध्ये बोलत होते.या वेळी पोहेकाॅ. एस.पी.दळवे- पाटील, पोकाॅ.दयानंद सोनकांबळे,वाडकर उपस्थित होते.. या महिण्यात विविध धर्मियांचे सण , उत्सव आले आहेत.व तसेच लोकसभेची आचारसंहिता लागली आहे.म्हणुन सर्वांनी नियम व कायदा याचा मान ठेवून सण,उत्सव,जयंती साजरी करणे गरजेचे आहे.आणी हे साजरे करताना डी.जे.लावू नये.डी. जे.लावल्यास रितसर कार्यवाही करण्यात येईल.पारंपारिक वाद्य लावा तसेच मद्य प्राशन करुन आनंदावर विरजन घालू नये. तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही. याची सगळ्यांनी दशता घ्यावी. डिजीटल लावणा-यांनी रितसर अर्ज करुन परवाना घ्यावा.पोस्टर वरील देवी,देवतांसह थोर महापुरुषांची विटंबना होणार नाही. याची काळजी संबंधितांनी घ्यावी. निवडणुक खाते सर्वञ करडी नजर ठेवून आहे.तेंव्हा सगळ्यांनी नीट कायद्याचे पालन करावे, अन्यथा कायदा आपले काम करेल. असेही ते म्हणाले.यावेळी रमन माने, मुनाफ टप्पेवाले,बेग मामा,गौतम सोनकांबळे,जेष्ठ पञकार पप्पू पाटील ज्ञानोबा गायकवाड,मसुरे,कांबळे, सोहेल टप्पेवाले, बोळेगावे, साळी, हर्षल चिंतलवार,भोसले,सिराज शेख, यांच्यासह अनेकजण उपस्थित होते..














