
प्रशांत दांडवे
विशेष तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही
7972418741
या धावपळीच्या व वाढत्या महागाईच्या काळात प्रत्येकाला रोजच जीवन जगणे कठीण झाले आहे. अश्यातच आपल्या सिंदेवाही तालुक्यातील महिला, पुरुष, मुला, मुलींना व बेरोजगार युवा वर्गाला रोजगाराच्या संधी निर्माण व्हावी व त्यांना स्वतःच्या पायावर उभे होता यावे यासाठी सिंदेवाही तालुक्यातील *ज्ञानगंगा मल्टिपर्पज फॉउंडेशन* या संस्थेमार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा वेगवेगळे प्रशिक्षण देऊन रोजगार देण्यास सहकार्य देण्यात येत आहोत.
आपल्या सिंदेवाही तालुक्यातील गरीब व होतकरू बेरोजगार मुला-मुलींना महिला, पुरुषांना तसेच विध्यार्थ्यांना योग्य प्रकारचे ज्ञान व प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
तरी या प्रशिक्षणाचा लाभ सर्वांनी घ्यावा व आपल्या परिवारास सहकार्य करावे.











