क्रिया फाउंडेशनच्या वतीने उपक्रम
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
नागभीड़ तालुक्यातील गिरगाव येथे क्रिया फाउंडेशनच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान, रोगनिदान शिबिर आणि मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गिरगाव येथील गांधी चौकात १३ एप्रिल २०२४ रोजी शनिवारी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. या रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करावे तसेच रोगनिदान शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन क्रिया फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

