अहमदनगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रा

0
162

संगीता खिलारी
महिला जिल्हा प्रतिनिधी,
अहमदनगर

अहमदनगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा आज नगर शहरात दुसरा दिवस असून सावेडी परिसरातील तपोवन मंदिरात आज दर्शन घेऊन निलेश लंके यांनी आजच्या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ केलेला आहे.
निलेश लंके हे तुतारी चिन्हावर सध्या निवडणूक लढवत असून मतदारसंघात त्यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. प्रत्येक गावातील तसेच शहरातील तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या अडचणी ऐकून घेण्यासाठी देखील ते वेळ देत आहेत ही बाब नागरिकांच्या विशेष पसंतीस पडत आहे.
आज तपोवन मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी यात्रेचा शुभारंभ केलेला असून शहरातील सावेडी , फकीरवाडा आणि भिंगार या प्रभागात त्यांची ही जनसंवाद यात्रा सुरू झाली आहे. जनसंवाद यात्रेच्या प्रारंभी निलेश लंके यांच्या प्रचारार्थ दुचाकी आणि चार चाकी गाड्यांचा ताफा असे या जनसंवाद यात्रेचे स्वरूप आहे. ‘ *नाद करायचा नाय*‘ हे निलेश लंके प्रचारार्थ बनवलेले गाणे या यात्रेत मोठ्या प्रमाणात वाजवले जात आहे.

महाविकास आघाडीचे शहरातील अनेक नेते यामध्ये सहभागी झालेले असून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे , शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते विक्रम राठोड , शरद पवार गटाचे नेते अभिषेक कळमकर , प्रकाश पोटे यांच्यासोबत बाळासाहेब बोराटे , संजय झिंजे तसेच महाविकास आघाडीत कार्यरत असलेले सर्व कार्यकर्ते आणि नेते रणरणत्या उन्हात या यात्रेत सहभागी झालेले आहेत. कमीत कमी दोन लाख लीड मिळवण्याच्या उद्देशाने निलेश लंके यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलेले असून त्यांच्या आवाहनाला कार्यकर्त्यांसोबतच नागरिकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here