जास्मिन शेख
चंद्रपूर प्रतिनिधी
समस्त महामानवांच्या महान कार्यास स्मरून त्यातून प्रेरणा घेत जनहितासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे या उद्देशातील सागर कलेक्शनचे ओनर आणि माणुसकी ग्रुप च्या टीम मेंबर्स कडून हा उपक्रम राबविण्यात आला.
गांधी चौक येथे सागर कलेक्शनच्या फूटपाथ वरील दुकानाच्या समोर स्टॉल लावून हे फळ वाटप आणि पाणी वाटप करण्यात आले.
यावेळी उन्हाच्या तडाख्यात बोधिसत्व डॉ. बाबासाहेबांना वंदन करायला येणारे उपासक-उपासिका, छोटी मुलं तसेच गांधी चौकाच्या मुख्य बाजारपेठेत बाहेरगावून येणाऱ्या ग्राहकांनी या फ्रुट प्लेट्स आणि थंडगार पाण्याचा अत्यंत आनंदित होऊन आस्वाद घेतला..
यावेळी सागर कलेक्शन ची संपूर्ण फॅमिली आणि माणुसकी ग्रुप मेंबर चे सदस्य यांनी मिळून श्रमदान देखील केले. 500 किलो फळ स्वच्छ धून त्याचे काप करून सर्व करणे सोबतच पाणी वाटप करणे अत्यंत मेहनतीचे होते. या साठी सलग 8 ते 10 तास लागलेत. तरीही समाजासाठी कार्य करतांना त्यांच्या चेहऱ्यावरिल आनंद बघितल्यावर सर्व थकवा निघून गेला आणि शेवटी पाहुणे दहा च्या सुमारास सर्व टीम मेंबर्स नी जयभीम जय संविधान चा नारा देत भिमाच्या गाण्यावर आपले पाय थिरकवले.. सरतेशेवटी झालेल्या कचऱ्याची देखील योग्य विल्हेवाट लावण्यात आली आणि फळांची साल जनावरांच्या एका फाउंडेशनला देण्यात आली. अशाप्रकारे अतिशय उत्साहात महामानवांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पडला.

