निवडणुक शांततेत होण्यासाठी हाळी परिसरातील अवैध दारु विक्रेत्यांना “तडीपार” करणे गरजेचे.जनतेत चर्चा
उदगीर प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
उदगीर – हाळीच्या बस स्थानकापुढे 1 पञी शेड मध्ये व परिसरात अनेक गावात तसेच वायगाव पाटी ते कुमठा बुद्रूक , हाडोळती या मार्गालगतच्या ढाब्यात सालाचे बारा महिने अवैध दारु विक्री जोमात होताना सामान्य जनतेला दिसते.माञ उत्पादन शुल्क विभाग उदगीर,लातुर येथील अधिका-यांना दिसत कसे नाही.का मंथली उत्पादन शुल्क चांगले मिळते म्हणुनच सं. दारु बंदी अधिकारी हे कोमात गेल्यानेच या भागात ड्राय डे सह सालभर देशी, विदेशी दारुची अवैध विक्री रुबाबात कांही महिलांसह अनेकजण करतात. विशेषत: स्थानिक वाढोना व हाळीचे पोलिसं कारवाई करतात.तरी पण या भागात अवैध दारु विक्री दारुबंदीच्या कोणत्या अधिका-याच्या आर्शिवादा- ने धुमधडाक्यात होत आहे.याचा शोध घेऊन कारवाई करण्याचे धैर्य वरिष्ठांनी दाखवावे.तसेच ठोक विक्रीचा परवाना नसतानाही ज्या परवानाधारक किरकोळ विक्रीच्या दुकाणातुन बाॅक्सच्या बाॅक्स दारुचे अवैधरित्या विकतात हाळीच्या त्या परवानाधारक दुकाणावर तसेच अवैधरित्या विकणा-यावर कारवाई करावी,अन्यथा मतदाना पर्यंत या दारुमुळे एखादी अघटीत घटना घडू शकते.अशी चर्चा हाळी व कुमठा- शिवनखेड रोड लगत कांही जाणकार मंडळीतुन होत आहे..
वरील ठिकाणासह अनेक गावात व हाळी येथे राज्यमार्गालगत ड्राय डे सह सालभर अवैध देशी,विदेशी दारु विक्री जोमात सुरु आहे.या विक्रेत्यां- लोकांकडे परवाना नसतानाही कांही महिलासह पुरुष मंडळी खुलेआमपणे अवैधरित्या दारु विकतात.याबाबत खोलात जाऊन माहिती घेतली असता एक्साईजवाल्यांना मंथली ठरलेले पॅकेट सर्व अवैध दारु विक्री करणारे तसेच ठोक विक्रीचा परवाना नसतानाही हाळीतील परवानाधारक रोज अंदाजे 20 / 25 पेट्या / बाॅक्स आम्हासारख्या अवैध दारु विक्रेत्यास विकतो.तरीही संबंधित दारुबंदीवाले त्या परवानाधारक दुकाणावर आणि आमच्यासारख्या अवैध दारु विक्री करणा-यावर कारवाई करण्याची डेअरींग एक्साईजवाल्यात नाही. अशी माहिती देशी दारुची अवैध वाहतूक व विक्री करणा-या हाळीच्या विक्रेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
वरील ठिकाणी अवैध दारु विक्रीने कळस गाठला असुन नागरीकांत या विक्रेत्यासह याला पाठीशी घालुन शांततामय परिसरास अशांततामय बनण्यास मदत करणा-या दारुबंदी खात्याबद्दल असंतोष पसरला आहे.. किरकोळचा परवाना असतानाही पेट्यांच्या पेट्या देशी दारुची विक्री करणा-या हाळीतील दुकाणदारास दारुबंदी अधिकारी पाठीशी का व कुणाच्या भितीमुळे पाठीशी घालतात असा प्रश्न उपस्थित होत आहे.कारण उदगीर,अहमदपुर,जळकोट,चाकुर या तालुक्यातील बहूतांश गावातील अवैध दारु विकणा-यांना हाळीच्या किरकोळ दारु विक्रीच्या दुकानातुन दारुच्या पेट्यांचा पुरवठा केला जातो. तेंव्हा हाळीच्या दुकाणावर तसेच या भागातील अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई करायची डेअरींग संबंधित दारुबंदी अधिका-यांमध्ये नाही.तेंव्हा येणारी निवडणुक शांततेत व्हावी. असे जर जिल्हा प्रशासनास वाटत असेल तर अवैध दारु विक्रेत्यांना तसेच किरकोळ विक्रीचा परवाना असुन ही ठोक मध्ये रोज 20 / 25 पेट्या विकणा-या हाळीच्या देशी दारु विक्रेत्या दुकाणदारास “तडीपार” करणे गरजेचे आहे.व अशी डेअरींग जिल्हाधिकारी व जि.पोलीस अधिक्षक लातुर यांनी दाखवावी.अशी चर्चा जनतेतून ऐकू येत आहे.तसेच 1 मे सह मतदानामुळे असलेल्या ड्राय डे दिनी होणा-या अवैध दारु विक्रीवर वाॅच ठेवणार कोण.याकडे जनतेचे लक्ष आहे..

