prabodhini news logo
Home अकोला आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील गाडीचा भीषण अपघात

आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील गाडीचा भीषण अपघात

0
308

सहा जणांचा मृत्यू

अकोला प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील गाडीचा शुक्रवारी दुपारी भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर शहराजवळ हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये किरण सरानाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक यांचा मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना अकोल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा अपघात झाला आहे.

दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. कारमधून किरण सरनाईक यांचा भाऊ, भावाचा मुलगा, मुलगी आणि नात प्रवास करत होते. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे.

मृतांमध्ये या लोकांचा समावेश

वाशिम रोडवर दोन कारची एकमेकांना जोरदार धडक बसल्यानं ही घटना घडली. आमदार किरण सरनाईक यांच्या नातेवाइकाचे कुटुंब हे कारने वाशिमकडून अकोल्याकडे येत होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारची पातूर उड्डाणपुलाजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये रघुवीर अरुणराव सरनाईक (रा.वाशीम) शिवानी अजिंक्य आमले (रा.नागपूर) अस्मिता अजिंक्य आमले (रा.नागपूर) अमोल शंकर ठाकरे, कपिल प्रकाश इंगळे, सिद्धार्थ यशवंत इंगळे हे सहा जण ठार झाले. या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहे. त्यात पियुष देशमुख (वय ११), सपना देशमुख आणि श्रेयस इंगळे यांचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु झाले आहे.

गावकऱ्यांची मदतीसाठी धाव

अपघाताची माहिती मिळताच मदतीसाठी गावकऱ्यांनी धाव घेतली. तातडीने रुग्णवाहिका आणि पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर मदतकार्य सुरु झाले. रुग्णांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here