prabodhini news logo
Home चंद्रपूर संतोष बारसागडे साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

संतोष बारसागडे साई कलारत्न समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

0
299

प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज

चंद्रपूर-दिनांक ३/५/२०२४ रोजी ओम साई विकास प्रतिष्ठान आणि बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन यांच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील २०२४ चा “साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार” सिध्द संकल्प लॉन साकुरी, शिर्डी येथे प्रधान करण्यात आला. या प्रसंगी सुदाम संसारे, वंदना गव्हाणे, मॉडेल अभिनेत्री सानवी वासनिक, डॉ.रविंद्र पाटील, डॉ.अजय वरुळकर आदी उपस्थित होते. संतोष बारसागडे हे झाडीपट्टी रंगभूमीवर लेखक, दिग्दर्शक व कलावंत म्हणून गेल्या २४ वर्षांपासून काम करित आहेत. त्यांची गीते अनेक नामवंत गायकांनी गायली असून गीतकार, संगीतकार म्हणूनही कलेच्या क्षेत्रात त्यांचे फार मोठे नाव आहे.
या सर्व कार्याची दखल घेऊन या वर्षीचा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार २०२४ देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी सिध्दार्थ कोवले, प्रशांत रामटेके, उपेंद्र वनकर, शुध्दोधन खोब्रागडे, प्रदिप नरवाडे व पंकज कांबळे अशा अनेक मित्र परिवारा कडून शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here