
प्रशांत रामटेके
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज
सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एक वेगळा नाव उमटवून समाजसेवा करत असलेल्या निशाताई धोंगडे सिने अभिनेत्री नाट्य कलावंत व सुप्रसिद्ध गायिका यांना सांस्कृतिक शैक्षणिक धार्मिक कामाची दखल घेऊन ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन निर्मित साई कला रक्त समाज भूषण पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आला होता शिर्डी येथे तो पुरस्कार तीन मे 2024 रोजी देण्यात आला व पुरस्कार सोहड्याचे समितीचे अध्यक्ष सुदाम संसारे व समितीचे सर्व पदाधिकारी ताईंचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अनेक पुरस्काराने सन्मानित असलेल्या निशाताई धोंगडे यांचा सर्वत्र कौतुक होत आहे व युवा पिढीसाठी प्रेरणादायी असं काम सांस्कृतिक सामाजिक कामाचे दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे पुढील युवा पिढीला व समाजामध्ये राहून सामाजिक भान ठेवून प्रबोधनात्मक कार्यक्रम व आंबेडकरी चळवळ या विषयावर लोकांना जागृत करण्याचं काम गायनाच्या व अभिनयाच्या माध्यमातून निशाताई धोंगडे सतत करत असतात. चंद्रपूर मधील सर्व मित्र मंडळी व पूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या पुरस्काराचे श्रेय ताईंनी आपल्या परिवाराला दिले त्या सांगतात की हे सर्व शक्य माझ्या सासूबाई मुळे झाल.
असे अनेक पुरस्कार व सन्मान मला फक्त आणि फक्त सासूबाई मुळे मिळाले.














