
कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर
“जल ही जीवन है” जगातील कोणताही जीव पाण्या शिवाय जगूच शकत नाही, उन्हाळा ची चाहूल लागल्याने तपणाऱ्या उन्हात पाण्यासाठी जीव अगदी कासावीस होतो, त्यामुळे काही व्यक्तींनी सामाजिक बांधिलीकी जोपासात मानवसाठी पाणपोई सुद्धा सुरु केली आहे. उन्हात घश्याला कोरड पडलेला व्यक्ती या पाणपोई चा लाभ घेत आहेत,माणुस तहान लागली तर बोलू शकतो पण इतर प्राण्यांचं काय यासाठी पशु पक्षांना ही जीव असतात.आणि हि बाब धरून पोलीस स्टेशन मधील वृक्षावर पक्षांचा वावर असल्याने तप्त उन्हाच्या चटक्यात पाण्यामुळे पक्षांचा जीव सुद्धा पाण्यासाठी कासावीस होत असतो पाणी न मिळाल्याने कोणत्याही पक्ष्याचा जीव जाऊ नये या साठी स्वाब संस्था व पोलीस स्टेशन सिंदेवाही च्या मार्फतीने पोलीस स्टेशन मधील वृक्षावर पक्ष्यासाठी पाण्याची घागर बांधली आहे.यावेळी पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण, पी एस आय सागर महल्ले,यांच्या मार्गदर्शनात बिट जमादार राजेश मडावी, व श्वेता शेंडे यांनी स्वाब संस्थेच्या पदाधिकारी यांच्या सोबत हा उपक्रम राबाविला आहे.














