prabodhini news logo
Home चंद्रपूर तळोधी (बा) येथील विश्वज्योती कॉन्व्हेंट स्कूलच्या खुशी मंगेश गभणेचे सुयश

तळोधी (बा) येथील विश्वज्योती कॉन्व्हेंट स्कूलच्या खुशी मंगेश गभणेचे सुयश

0
288

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपूर

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापुर येथील रहिवासी असलेली आणि नागभीड़ तालुक्यातील गुणवत्तापूर्ण व नामांकित शाळा म्हणून तळोधी (बा) येथील विश्वज्योती कॉन्व्हेंट स्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी खुशी मंगेश गभणे हिने नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या सीबीएससी परीक्षेत ९०.८० टक्के गुण मिळवून मेरिट येण्याचा मान पटकाविला आहे. खुशीला ६०० पैकी ५४४ गुण प्राप्त झाले आहेत. यापैकी मराठी विषयात सर्वाधिक १०० पैकी ९६ व सामाजिक विज्ञानमध्ये ९० गुण आणि गणित विषयात ९० गुण मिळविले आहेत.

खुशी मंगेश गभणे हिला भविष्यात प्रशासकीय अधिकारी व्हायचे आहे. तिच्या यशाबद्दल, शाळेच्या प्राचार्या सिस्टर अनिस जोश, शिक्षिका भावना, मार्गदर्शक धनविजय, चेतना, वडील मंगेश गभणे, आई भावना गभणे, सुलोचना गभणे, शैलेश गभणे,मालिनी गभणे व शाळेतील सर्व शिक्षकांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here