

अमरावती प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
मोर्शी- आज दिनांक 16 मे 2024 रोजी राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील वैद्यकीय अधीक्षक माननीय डॉक्टर प्रमोद पोतदार तसेच जिल्हा हिवताप अधिकारी माननीय डॉक्टर शरद जोगी व जिल्हा हत्तीरोग अधिकारी दिनेश भगत यांचे मार्गदर्शनाखाली मोर्शी शहरातील पावडे नर्सिंग होम येथे राष्ट्रीय डेंगू दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमांमध्ये डेंगू आजाराबाबत प्रकाश मंगळे, विनय शेलुरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावर्षीचे डेंगू दिनाचे घोषवाक्य “Conect with community, control dengu” समुदायाच्या संपर्कात रहा डेंगूला नियंत्रित करा. याबाबत शहरांमध्ये डेंगू जनजागृती पर प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये 1)आठवड्यातून एक दिवस कोरडा पाडा
2) गप्पी मासे पाळा हिवताप, हत्तीरोग ,डेंगू टाळा. अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी आरोग्य कर्मचारी प्रशांत बेहरे, नंदू थोरात ,नागेश उडघे, गजानन शिवणकर ऋषिकेश दहेकर तसेच पावडे नर्सिंग कॉलेजचे शिक्षक दत्तू सुरवसे कर्मचारी श्री नेवारे व कॉलेजच्या सर्व प्रशिक्षणार्थी हजर होत्या.











