अमरावती प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
तिवसा – जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.शरद जोगी साहेब व तिवसा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.शिवाजी माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय डेंग्यू दिवस हा साजरा करण्यात आला. डेंग्यू आजाराविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. डेंग्यूबद्दल कुठली काळजी आणि उपाययोजना कराव्यात व स्वच्छतेचे महत्व काय असते आणि आपण डेंग्यू पासून दूर कसे राहू शकतो आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवावी याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच आशा व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत गप्पी मासे सोडण्यात आले. डेंग्यू रोगाबद्दल माहिती आरोग्य कर्मचारी विजय साळुंके यांनी दिली.
यावेळी रोशनी यावले, मेंढे, मानमोडे, सुरटकर, शुभम पौल हे कर्मचारी हजर होते. हा संपूर्ण कार्यक्रम साळुंके यांनी उत्कृष्टरित्या पूर्ण करण्याकरिता अथक परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला.

