जुन्नर तालुक्यामध्ये ओतूर गाव या ठिकाणी मातंग समाजावर होणारा अन्याय अत्याचार विरुद्ध लढा देणार

0
245


वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन

सोनाली घाटगे
महिला जिल्हा संपादक
पुणे

समस्त दलित महिला मातंग वस्ती डॉ.आंबेडकर रोड, मातंग वस्ती, मु. पो. ओतूर ता. जुन्नर, जि पुणे. या पत्ता प्रमाणे राहत असलेल्या स्थानिक मातंग समाज यांचे तक्रार अर्ज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे तालुका अध्यक्ष मा. सागर पवार यांना प्राप्त झाल्यास, गटविकास अधिकारी जुन्नर मध्ये भेट घेऊन कार्यकर्त्यांनी निवेदन देण्यात आले की, मातंग समाजाने वारंवार आपल्याला तीन वर्षापासून पत्र व्यवहार करून आपण कोणत्याही प्रकारचे दखल घेतली नाही तीन वर्षांमध्ये उडवा उडवी चे उत्तर देत आले, मातंग समाज यांचे हक्काचे समाज मंदिर असूनही ग्रामपंचायत यांच्या चुकीच्या निर्णयामुळे तीन वर्षापासून महापुरुषांची जयंती रस्त्यावर साजरी केली जात आहे, हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही व समाजाच्या धार्मिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे बंद करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत करत आहे असे दिसून येते, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना समाजासाठी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागला परंतु भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण झाले परंतु जातीवाद संपलेला नाही. ग्रामपंचायत मध्ये अधिकृतपणे मातंग समाजाला पिण्याच्या पाण्यासाठी सरकारी निधी वापरून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाण्याच्या टाकी द्वारा करण्यात आली, परंतु मातंग समाजाला पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई करून इतर समाजाला पाणी पुरवण्याचे काम चालू आहे, संपूर्ण गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असून मातंग समाज वस्ती मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कोणताही प्रकारचे लावले गेलं नाही, भविष्यात मातंग वस्तीमध्ये कोणत्याही प्रकारचे मोठी घटना घडली याला संपूर्णपणे जबाबदार ग्रामपंचायत चे पदाधिकारी असेल, हा संपूर्णपणे जातिवाद दूषित वातावरण करण्याचा प्रयत्न गेल्या तीन वर्षापासून चालू आहे,ओतूर गावामध्ये स्वतंत्र अंगणवाडी ची निर्मिती करण्यात यावी.ही स्थानिक जनतेची मागणी आहे.आपणास सांगण्यात येत आहे की, मातंग समाज मंदिरामध्ये भगवान गौतम बुद्ध यांची प्राणप्रतिष्ठा करून बुद्धमूर्ती स्थापन करण्याचे नियोजन दिनांक ६ जून २०२४ रोजी ठरलं आहे, हुकूमशाही पद्धतीने धार्मिक कार्यक्रमांमध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत चे पदाधिकारी यांनी तीन वर्षापासून मातंग समाज मंदिरापासून मातंग समाजांना वंचित ठेवला आहे त्याकरिता तात्काळ योग्य ते निर्णय घेऊन समाज मंदिर चा ताबा समाजाला देण्यात यावा, अन्यथा “हुकूमशाही विरोधात लोकशाही” वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने इच्छा नसताना देखील गटविकास अधिकारी यांच्या विरोधात जुन्नर तालुका पंचायत समिती समोरील जन आक्रोश आंदोलन दिनांक १० जून२०२४ रोजी सकाळी १०:००वा घेणार आहोत, अपेक्षा आहे की आंदोलन घेण्याची वेळ न येता आपण समाज मंदिर समाजाच्या ताब्यात द्यावे. असे निवेदन पत्र गटविकास अधिकारी जुन्नर, ओतूर ग्रामपंचायत/ग्रामसेवक, व पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. व मातंग समाज मंदिर ला भेट देण्यासाठी उपस्थित असलेले कार्यकर्ते जावेद भाई मोमीन (वं.ब.आ.पुणे जिल्हा सल्लागार), मारुती किसन खरात (वरिष्ठ नेते), भरत आस्वार (पत्रकार प्रभात), प्रदीप गौतम साळवे (पुणे जिल्हा निरीक्षक), पंकज भाऊराव सरोदे (आंबेगाव तालुका अध्यक्ष), सागर पवार (जुन्नर तालुका अध्यक्ष), नफीज भाई शेख (आंबेगाव तालुका उपाध्यक्ष), आकाश शिंदे (घोडेगाव शहर संघटक ),आशुतोष मोरे (आंबेगाव तालुका सचिव), गणेश अस्वार (जुन्नर तालुका सचिव), मंगेश राठोड (घोडेगाव शहर उपाध्यक्ष), सुरेश रोकडे (आंबेगाव तालुका सल्लागार ), शाहरुख खान, रोहित शिंदे, रमजान इनामदार हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here